¡Sorpréndeme!

Minal Shah | 'या' वयात मीनल बनली कुटुंबप्रमुख | bigg Boss Marathi 3

2021-10-16 5 Dailymotion

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या घरात एक खेळाडू, लढाऊ, sorted मुलगी स्पर्धक म्हणून बघायला मिळतिये. ती म्हणजे मीनल शाह. मीनलने घरात आल्यापासूनच स्वतःच स्थान निर्माण केलं. तिने प्रत्येक टास्क छान परफॉर्म केला. जिथे तिची विशाल, विकास, सोनालीशी मैत्री होत होती. तिथे तिचे काही सदस्यांसोबत खटके ही उडत होते. पण त्यातून स्वतःला सांभाळत आपल्या बोलण्यावर ठाम राहत तिने आतापर्यंतचा बिग बॉस मराठीच्या घरातला पल्ला गाठला आहे. घरात जशी मीनल दिसतीये तशी खऱ्या आयुष्यात ती कशी आहे. तिचा काय struggle आहे. तिचं शिक्षण, रिलेशनशिप, कुटुंब या सगळ्याबद्दल आज जाणून घेऊया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale